दादा आले, मोर्शीकरांना अभिवादन केले अन् निघून गेले; ना प्रचार ना सभा!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

मोर्शी : राज्यात महायुती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप मोर्शी मतदारसंघात प्रतिस्पर्धी आहे. म्हणूनच रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘घड्याळ’ नको ‘कमळ’ निवडून आणण्याचे आवाहन केले. त्याचा फटका विद्यमान आमदारांना बसणार असताना सोमवारी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील मोर्शीकरांना अभिवादन करून निघून गेल्याने आमदार देवेंद्र भुयार यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा वरुडात चांगलीच रंगली आहे. त्यामुळे सोमवारी दौऱ्यावर आलेले अजित पवार हे देवेंद्र भुयारांसाठी संकटमोचन ठरू शकतात,असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यासाठी जंगी तयारीही करण्यात आली होती. मोर्शीत दादांचा रोड शो होणार असल्याने ते आमदारांबद्दल काही बोलतील, असे वाटत होते. मात्र, दादांनी मोर्शीकरांना अभिवादन केले.

अन् हेलिकॉप्टरने अमरावती बेलोरा विमानतळाकडे रवाना झाले. अजित पवारांच्या भाषणावर भुयारांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते, अशी चर्चा मोर्शी मतदारसंघात रंगली आहे. दादांचे हेलिकॉप्टर शिरखेडला दुपारी ४ वाजून २३ मिनिटाला लँड झाले. येथून १३ किमी कारने येरला फाटा येथे येऊन रोड शो ला सुरुवात झाली. कुठलीही सभा किंवा भाषण न करता मोर्शीकरांना हात उंचावून अभिवादन करून ते निघून गेले. यावेळी उमेदवार आ. देवेंद्र भुयार, डॉ. मोनाली भुयार, राष्ट्रवादी प्रदेश सदस्य प्रमोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तारेश देशमुख आदी उपस्थित होते.

 

अपक्ष उमेदवारांमध्ये ‘फिल गुड’भाजप नेते अमित शहा यांनी ‘घड्याळ’ नकोचा दिलेला नारा अन् दादांचा फ्लॉप झालेल्या रोड शोमुळे अपक्ष उमेदवारांमध्ये ‘फिल गुड’चे वातावरण निर्माण झाले आहे. अपक्ष म्हणून मैदानात असेलेले विक्रम ठाकरे या तरुण चेहऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे नागरिक सांगतात. ठाकरे यांच्या सोशल कनेक्टिव्हिटीची चर्चा विरोधकही करू लागले आहे. इतिहास सांगतो, मोर्शी मतदारसंघ अपक्षांसाठी पोषक आहे.

 

मैत्रीपूर्ण लढतीत भुयारांची दमछाक !मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत असल्याने भाजपने आपला उमेदवार मैदानात उतरविला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी मोर्शीला टार्गेट केले आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनंतर वातावरण निर्मिती झाली. स्थानिक भाजप नेत्यांचा विद्यमान आमदारांना कडाडून विरोध आहे. तिकडे अजित पवारांनीही भुयारांना मैदानात उतरविले. मात्र, दादांवर भिस्त असलेल्या भुयारांच्या स्वप्नांवर विरजन पडल्याची चर्चा रंगली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!