
अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पथ्रोट शिंदी रोडवरून एका तरूणाकडून १ किलो ५४१ ग्रॅम गांजा जप्त केला. १० नोव्हेंबर रोजी गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अल्केश चक्रधर राउत (वय २५ वर्ष, रा. वार्ड नं. १, पथ्रोट) असे अटक आरोपीचे नाव आहे. २२ हजार ५०० रुपये किमतीच्या गांजासह त्याला पथ्रोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना पथ्रोट गावात राहणारा अल्केश राऊत हा गांजाविक्रीसाठी शिंदी रोडवर उभा असल्याची माहिती मिळाली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ५४१ ग्रॅम गांजा व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिक्षक नितीन इंगोले, पोलीस अंमलदार सुनील महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, संजय प्रधान यांनी ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







