
अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचे प्रचार बॅनर फाडणे व जाळल्याप्रकरणी वलगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याबाबत नया अकोला येथील माजी सरपंच रणजीत तिडके यांनी वलगाव पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार, यशोमती ठाकूर यांचे नया अकोला येथील एक बॅनर जाळण्याचा प्रयत्न झाला, तर वलगाव येथील एक बॅनर फाडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ते दोन्ही प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडले. तो प्रकार राजकीय विरोधकांकडून घडविण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 76







