चला बाई चला, प्रचाराला चला, पाचशे रुपये रोज घ्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

वरूड : नेत्यांच्या सभा, प्रचारासाठी विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला असून म्होरक्या मोहल्ल्यात फिरून “चला बाई चला प्रचाराला चला, पाचशे रुपये घ्या अन् जेवण मोफत करा, अशा विनवण्या करून शेतमजूर महिला, बचत गट यांना प्रलोभन दिले जात असल्याचे मतदारांतूनच सांगण्यात येते.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या नेत्यांच्या सभा, गावोगावी प्रचारासाठी विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न उमेदवार करीत आहे.

पत्रक वाटण्याकरिता ५०० रुपये रोजंदारीने मजूर कार्यकर्ते गोळा करण्याचा तर तरुणाईला गाडी आणि खर्चाची रक्कम देऊन कार्यकर्त्यांची गर्दी दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांनी सुरू केला.

एवढ्यावरच थांबले नाही तर शासनाच्या योजनासुद्धा बॅनरवर झळकू लागल्या. परंतु महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या बॅनरवर नेत्यांच्या फोटोमध्ये दुजाभाव दिसून येते. भाजपच्या बॅनरवरून अजितदादा गायब तर राष्ट्रवादीच्या बॅनरवरून मोदी, शहांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब अशी अवस्था असल्याने दोन्ही उमेदवार म्हणते आमच्या नेत्यांनीच लाडकी बहीण योजना आणली आणि ती सुरू ठेवण्यासाठी मते आम्हालाच द्या! अशी विनवणी मतदारांना केली जात असल्याने उमेदवारांकडून प्रचारात वेगवेगळा फंडा मोर्शी विधानसभा मतदार संघात वापरणे सुरू केले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!