आठ मतदारसंघांमध्ये ९८ तृतीयपंथी मतदार; उभे कोणत्या रांगेत राहणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : मतदानासाठी मतदान केंद्रांवर महिला व पुरुष अशा दोन रांगा असतात. मतदानासाठी तृतीयपंथी मतदारदेखील येतात. त्यांनी कोणत्या रांगेत मतदानाला उभे राहावे, हा प्रश्न निर्माण होतो. तूर्तास या मतदारांना दोन्ही रांगांचा पर्याय उपलब्ध असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

जिल्ह्यात २५,४६,४५८ मतदार आहेत. यामध्ये १२,९३,६८१ पुरुष, १२,५२,६८० महिला व इतर मतदार आहेत. मतदारांसाठी सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत. सावलीसाठी मंडप, बसण्यासाठी खुर्ची, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी यासह अन्य सर्व आवश्यक त्या सुविधा आहेत.

सर्वाधिक तृतीयपंथी मतदार बडनेरा, अमरावतीत जिल्ह्यात ९८ तृतीयपंथी मतदार असले तरी सर्वाधिक ४५ मतदार बडनेरा मतदारसंघात व अमरावतीमध्ये २७ व मेळघाटातमध्ये ११ तृतीयपंथी मतदार आहेत. अन्य पाच मतदारसंघात या मतदारांची संख्या कमी आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013585
error: Content is protected !!