करजगावात गाईच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती / हिवरखेड माहुली जहागीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करजगाव शिवारात गाईच्या तोंडात गावठी बॉम्ब फुटल्याची घटना घडली आहे. यामुळे खालचा जबडा गायब झाला असून जीभ लोंबकळली आहे. तातडीने उपचार न मिळाल्यास ही गाय दगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, अमरावती तालुक्यातील करजगाव येथील सुरेश मल्लूजी धोटे या शेतकऱ्याची ही गाय आहे. बुधवारी गावानजीक तलावाशेजारी असलेल्या झुडपी जंगलात गाय चरण्यासाठी गेली होती. येथेच गावठी बॉम्ब चावला गेल्याने तो दातात येताच त्याचा स्फोट झाला. यामुळे या गायीचा खालचा जबडा तुटून जीभ लोंबकळली आहे. यामुळे पशुपालकाचे ६० हजारांचे नुकसान झाले आहे.एक वर्षा अगोदर याच शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागून जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले होते, तर आठ दिवस अगोदर एका गायीचा अचानक मृत्यू झाला. या प्रकारे शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले आहे. या झुडपी जंगलात गावठी बॉम्ब ठेवणाऱ्याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी यांनी वनविभागाकडे करण्यात आली आहे.दरम्यान, वनविभागाने तातडीने भरपाईचा मुद्दा फेटाळला. पशू जंगलात चारण्यासाठी आवश्यक पास काढलेली नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013582
error: Content is protected !!