
धारणी: गेल्या पंधरा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या लगबगीत असलेले शेतमजूर आणि शेतकरी निवडणूक संपताच आपल्या कामाला लागले. यादरम्यान रोजगारानिमित्त बाहेर गेलेले मजूरसुद्धा पुन्हा आपल्या रोजगारासाठी बुधवारी मतदान झाल्यापासूनच स्थलांतरित झालेहेत.
पंधरवड्यात प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने दररोज सायंकाळी कार्यकर्त्यांसाठी जेवण खाण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या वाहनांमध्ये बसण्यासाठी दर दिवशी ३०० रुपये आणि इतर खर्च उमेदवाराकडे असल्यामुळे या काळात शेतकऱ्यांना शेतमजूर उपलब्ध होणे कठीण झालेहोते. परंतु, आता निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर मजुरांनी पलायन केले. शेतकरी आणि शेतमजूरसुद्धा रब्बी हंगामाच्या कामात व्यस्त झालेला आहे.
यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. पंधरा दिवसांपासून खाण्यापिण्याची व्यवस्था केल्यानंतर कत्तलीचे रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात मतदारांना लक्ष्मी दर्शन करण्यात आले.
शंभर ते पाचशे रुपयांप्रमाणे प्रत्येक मतदाराला वाटण्यात आल्याची खमंग चर्चा मेळघाट विधानसभा निवडणुकीमध्ये ऐकावयास मिळत आहे. आता निवडणूक प्रक्रिया संपल्याने कार्यकर्ते आणि उमेदवार यांची येते दोन दिवस झोप उडणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







