
नवीन बसस्थानक परिसरात मंगळवारी सांयकाळी ८.३० वाजताचे सुमारास पोलीस व्हॅनला एका दुचाकी धडकली. या घटनेत २० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथून दर्यापूरकडे जात असलेली पोलीस व्हॅन (एमएच २७ एए ५१४६) ला भरधाव दुचाकी धडकली. या धडकेत भैयालाल पटेल (२०, रा. बरडी शिंगरोली, मध्यप्रदेश) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 123







