
अमरावती महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला येथील इर्विन चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (ईर्विन चौक) स्थित डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना, राजकीय पक्षांसह आंबेडकरी अनुयायी आपल्या मुक्तिदात्यापुढे नतमस्तक झाले.
मध्यरात्री १२ वाजतापासूनच महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी गर्दी झाली होती. रक्ताचा एक थेंब न सांडवता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९७६ साली नागपूर येथे धम्मक्रांती घडवून आणली. बाबासाहेबांनी देशात हजारोवर्ष गुलामीचे जीवन जगणाऱ्या समाजाला गुलामीतून मुक्त केले त्यांच्या अंधाररेल्या वस्त्यांमध्ये ज्ञानाचा सूर्यच बाबासाहेबांनी प्रेरला. म्हणूनच दरवर्षी आपल्या मुक्तीदात्याला ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीसह जिल्हाभरात आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी सहा वाजता कैण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून
महामानवाच्या पुतळ्याजवळ कॅण्डल लावून महामानवाला आदरांजली अर्पण केली. यावेळी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, माजी सैनिकांच्यावतीने मानवंदना देण्यात आली येथील आक्रमक संघटनेच्यावतीने बिगुल वाजवून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बडनेरा येथील संडे मिशन, दी बुद्धिस्ट संडे स्कूलचे विद्यार्थी हजर होते. यावेळी आक्रमक संघटनेच्यावतीने आयोजित आदरांजलीचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. दिलीप एहतकर होते, प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकुर, उपजिल्हाधिकारी अनिल भटक्कर, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, कर्नाटकचे आमदार प्रदीप ईश्वर, आक्रमक संघटनेचे प्रमुख अॅड. सुनील गजभिये, प्रीती बंड, जगदीश गोवर्धन, हरिभाऊ मोहोड, हरीश मोरे, रामेश्वर अभ्यंकर, समाधान वानखडे, दादाराव खंडारे, विजय गायकवाड, नीलेश मेश्राम, योगेश कोळी, सूर्यकांत गवई, सुखदेव इंगोले, पंकज मेश्राम आदी उपस्थित होते. दरम्यान ‘नवीन मनुस्मृती गाडल्याशिवाय स्वस्थ बसु नका’ या विषयावर व्याख्यानमाला पार पडली, यावेळी चौकामध्ये दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमदेखील सुरू होते. परिसरात किचेन, लॉकेट, माळा, बुद्ध-फुले-आंबेडकरांची दिनदर्शिका, निळे आणि पंचशील झेंडे, बुद्ध पूजा वंदना साहित्य आणि पर्नेटो विक्रीच्या स्टॉलने चांगलीच गर्दी खेचली.
ग्रंथसंपदा अन् मूर्ती विक्री स्टॉलने वेधले लक्ष महापरिनिर्वाण दिनाला होणारी ग्रंथांची विक्री ही खया अर्थाने त्यांना अभिद्यादन असते. यंदाही आंबेडकर चौकात पुस्तक विक्री तसेच मुर्ती विक्रीची। दुकाने लक्ष वेधणारी ठरली. त्यामुळे यंदाही लाखो रुपयाची ग्रंथखरेदी अनुयायांनी केली. तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी मूर्ती विक्रीचे स्टॉलवर गर्दी दिसून आली.
हार-फुलांच्या दुकानांसह आरोग्य तपासणी शिबिरही इर्विन चौकात डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दिवसभर रांगा होत्या. अनुयायांच्या हातात हार आणि मेणबत्ती लक्ष वेधणारी होती. त्यामुळे परिसरात हार- फुलांची दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती. तसेच द्वचिन रुग्णालयासमोर डॉ. बी. आर. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्यावतीने रोगनिदान चिकित्सा शिबिर घेण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







