तिने फोडला बाइकचा हेडलाईट; त्याने थेट अॅसिडच फेकले !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : त्याने पत्नीकडे तिच्या तुटपुंज्या पगारातील साडेतीन हजार रुपये मागितले. त्यावर तिने नकार दिला. हे ऐकताच त्याने तिचा मोबाईल फोडला. तिनेही प्रत्युत्तरात त्याच्या बाईकचा हेडलाईट फोडला. मग काय, वाद विकोपाला गेल्यावर त्याने घरातील बाथरूममधील अॅसिड आणून पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले. त्यात ती सुमारे १३ टक्के भाजली.

कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची ही धक्कादायक घटना ५ डिसेंबर रोजी रात्री ९:३० ते ११ वाजताचे दरम्यान खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

स्वाती (३२) असे गंभीररीत्या भाजलेल्या पत्नीचे तर शुभम (२६) असे आरोपी पतीचे नाव आहे. शुभम हा पत्नी स्वाती हिच्यासह म्हाडा कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो. दोघेही एकमेकांच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शुभम हा पत्नीला घ्यायला तिच्या दुकानात गेला. घरी पोहोचल्यावर रात्री ९:३० च्या सुमारास शुभमने पत्नी स्वातीकडे साडेतीन हजार रुपये मागितले. परंतु, स्वातीने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून शुभमने स्वातीसोबत वाद घालून तिचा मोबाईल फोडला. त्यावर स्वातीने रागाच्या भरात पती शुभमच्या दुचाकीचा हेडलाईट फोडला, गाडी पाडली. त्याचवेळी शुभमने घरातील बाथरूममधील अॅसिड आणून पत्नी स्वातीच्या चेहऱ्यावर फेकले. त्यात स्वाती गंभीररीत्या भाजली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून नणंद व नंदोईने तेथे धाव घेतली. त्यांनीच गंभीररीत्या भाजलेल्या स्वातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी शुभमविरुद्ध बीएनएसअन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय गरुड करत आहेत.

तीन वर्षांपूर्वी झाला प्रेमविवाह स्वाती व शुभमचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. स्वाती हिला पहिल्या पतीपासून ११ वर्षांचा मुलगा आहे. तो आजीकडे राहतो. पती शुभम हा लग्न आल्यापासूनच आपल्या चारित्र्यावर संशय घेतो. त्या कारणावरून वाद घालतो तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून तुला फसवेन, अशा धमक्या देतो. त्याबाबत आपण राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रारदेखील केली होती. मात्र, ते प्रकरण आपण आपसी सहमतीने मिटवले. मात्र, त्यानंतरही पती शुभमचा त्रास कमी झाला नाही, असे स्वाती हिने जबानीत म्हटले आहे. त्याला खोलापुरी गेट पोलिसांनी दुजोरा दिला.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!