मोर्शीत दोन दुचाकी धडकल्या, युवक ठार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

मोर्शी : शहरातील चित्रपटगृहात झळकलेला पुष्पा-२ पाहण्यासाठी येत असलेल्या आणि हा चित्रपट पाहून निघालेल्या प्रत्येकी तीन युवकांच्या दुचाकी पाळा मार्गावर एकमेकांवर आदळल्या. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व युवक सालबर्डी येथील रहिवासी आहेत. ५ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता हा अपघात मोर्शी ते पाळा मार्गातील वळण रस्त्यावर घडला.

सूत्रांनुसार, प्रथमेश रासेगावकर (१८), विशाल उईके (१८), पवन धुर्वे (१९), दिनेश इरावित (२१), शुभम कुमरे (२०), भूषण झोड (२२, सर्व रा. सालबर्डी) हे मोर्शी येथे चित्रपट बघण्यासाठी आले होते. या सहापैकी तीन युवक सायंकाळी ६ ते ९ चा खेळ बघून पाळा मार्गे परत निघाले, तर तीन युवक रात्री ९ ते १२ चा खेळ बघण्यासाठी पाळा मार्गे मोर्शीला येत होते. त्यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते.

तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पंडागरे, रवी परतेती, जलजीवन आपत्ती बचाव दलाचे प्रियांशु तायवाडे व अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना तात्काळ मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. दरम्यान, ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता भूषण झोड याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर शुभम कुमरे याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. प्रेम मडावी, यश पांडे, कांतीलाल सिरसाम, सुभाष पुसाम, नितेश गोडबोले, रवी सरियाम, स्वप्निल गुळदे, सौरभ धोटे आदी मोर्शीकर युवकांनी उपचारासाठी मदत केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!