
अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांना आता ‘युनिक आयडी’ देण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाद्वारा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे.
अग्रीस्टॅक प्रकल्पातंर्गत प्रत्येक शेतकऱ्यांचे ओळखपत्र होणार आहे शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्याच्या शेताशी जोडून शेतकऱ्यांना त्याच्या शेतासह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधारसारखा एक युनिक आयडी नंबर देण्यात येणार आहे. डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र मिळणार आहे.
या माध्यमातून शेतीसंबंधीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत गतीने पोहोचविण्यात येणार आहे.
काय कागदपत्रे लागणार?
या योजनेमध्ये शेतकऱ्यााचा आधार क्रमांक, सातबारा, आठ-अ ही कागदपत्रे संकलित होणार आहेत.
१६ डिसेंबरपर्यंत प्रत्येक तालुक्याला ही मोहीम पूर्ण करायची आहे. तशा सूचना आहेत.
बँक, आधार, पॅनचा डेटा मिळणार या फार्मर आयडी क्रमांकाला शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, पॅनचा डेटादेखील जोडला जाणार आहे.
या कामकाजासाठी मास्टर ट्रेनर नियुक्त केले आहे. याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पद्धतीची माहिती संकलित होत आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी देणार प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडीच्या माध्यमातून एक स्वतंत्र क्रमांक उपलब्ध झाल्याने देशभरात हा क्रमांक त्याच शेतकऱ्याकडे असणार आहे.
‘फार्मर आयडी’ यासाठी ठरणार महत्त्वाचा कुठल्याही योजनेची अंमलबजावणी, पीक कर्ज काढणे, याबाबीसाठी फार्मर आयडी महत्त्वाचा असेल.
महसूल विभागाकडे सोपविली जबाबदारी उपविभागीय अधिकारी हे तालुका समितीचे अध्यक्ष असून प्रत्येक अधीनस्त तालुक्यासाठी तहसीलदार, तालुका उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांची संयुक्त समिती असणार आहे. या माध्यमातून अंमल होईल.
प्रशासनाची तयारी फार्मर आयडी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, माहिती अपलोड करणे याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
– अनिल भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







