आयुक्तालयात तीन नवे पोलिस ठाणे निर्मितीसाठी भक्कम प्रयत्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती, बडनेरा मतदार संघासह तिवसा विधानसभा मतदार संघाचा बराचसा भाग आयुक्तालय हद्दीत येतो. त्यामुळे आयुक्तालयात आणखी तीन नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती आवश्यक आहे. तपोवन, एमआयडीसी व साईनगर या तीन भागात तीन नवे पोलिस ठाणे निर्माण झाल्यास पोलिसांनी अधिक सक्षमपणे काम करता येणार नसल्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. त्यासाठी गृहमंत्रालयाकडे जोरकस पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्थानिक जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांची कारकिर्द व अमरावती शहरातील

कामगिरीची माहीती दिली. अलिकडे गुन्हयांचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगाराची पद्धत वेगळी आहे. तरूणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील घटना लक्षात घेता अनेक भागात पोलिसांद्वारा कारवाई करण्यात आली. पोलिसांचा

धाकअसला पाहिजे असे सांगितले जात असले तरी ही बाब पूर्णपणे अंमलात येवू शकत नाही. सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात अटक करतांना अडचणी येतात. मानवाधिकारामुळे पोलिस बेधडक कारवाई करण्यात देखील

अडथळे येत असल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारांवर कायदेशीर वचक ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठीच अॅक्टीव्ह पोलिसिंग महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. अमरावती पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळतांना अनेक अनुभव गाठीशी आलेत. आपल्या कार्यकाळात आपण सीसीटीव्हीचा मुद्दा लावून धरला. काही प्रमाणात त्याच यश मिळाले. यासोबतच महिलांची सुरक्षेला प्राथमिकता दिली आहे. या गुन्ह्यात घट आणणे महत्वाचे आहे. यासोबतच वाढती सायबर गुन्हेगारी थांबविण्यासाठी समाजजागृती होणे गरजेचे असल्याचे मत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केले.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण पोलिस यंत्रणा सजग आहे. अमरावतीकरांनी आपल्याला उत्तम सहकार्य लाभल्याचे सीपी रेड्डी म्हणालेत.

 

पोलिस बिट्ला सक्षम व्हावी, ड्रग्सविरोधात कारवाईला प्राधान्य पोलिस दलात बिट्स सक्षम असल्यास अनेक कामे सोपी होतात. आपण आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. अधिकारी व कर्मचाऱ्याना त्यांच्या बिट्स स्ट्रॉग करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस समाजभिमुख झाले तरी आणखी समाजभिमुखता आणणे आवश्यक आहे. अधिकारी बदलत असले तरी समाज व पोलिस खाते यांच्यात सुसंवाद असण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. आपल्या कार्यकाळात आपण एमपीडीएप्रमाणेच ड्रग्जविरोधात कारवाई केली. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले असून आरोपींना देखील अटक केली. तरूण पिढीला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांची ही कामगिरी महत्वाची ठरत आहे. याशिवाय सायबर गुन्हेगारापासून बचाव करण्यासाठी पोलीसांनी शाळा व महाविद्यालय पातळीवर जनजागृती केली असल्याचे सीपींनी सांगितले.

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!