अमरावती-परतवाडा शेवटची बसफेरी अचलपुरातून न्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अचलपूर : दररोज रात्री १० वाजता अमरावती येथून परतवाडाकरिता सुटणारी शेड्युल क्रमांक ८७ ही शेवटची बसफेरी अचलपुरातून नेली जावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

अमरावती-परतवाडा रात्री १० वाजता अमरावतीहून सुटणारी शेवटची एसटी दिवसांपासून अचलपूरला येणे बंद झाले आहे.

पूर्वी ही एसटी बस नागपूर गेट मार्गे अचलपूरला येत होती. या शेवटच्या फेरीमध्ये अचलपुरात मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. यात व्यापारी, विद्यार्थी, महिलांचाही समावेश असतो. तथापि, ही शेवटची फेरी मागील अनेक दिवसांपासून अचलपुरात येतच नाही. प्रवाशांना चांदूर नाका किंवा अचलपूर नाक्यावर रात्री अकरा-साडेअकराच्या सुमारास उतरून पुढील प्रवास करावा लागतो. रात्री ११ नंतर ऑटोरिक्षा उपलब्ध होत नाही.

त्यामुळे अनेकांना पायीच अचलपुरात यावे लागते. त्यामुळे एसटी महामंडळाने अमरावती येथून रात्री १० वाजता सुटणारी शेवटची बसफेरी अचलपूरला न्यावी, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशी वर्गाकडून होत आहे.

अचलपूर नागपूर फेरी सुरु मागील अनेक दिवसांपासून बंद असलेली एसटी महामंडळाची अचलपूर-नागपूर ही सव्वासहाची फेरी पुन्हा सुरू झालेली आहे. ‘लोकमत’ने नागरिकांच्या या मागणीचा पाठपुरावा केला होता, आता अचलपुरातून नागपूरला जाण्याकरता विद्यार्थी, रुग्णांना सुविधा झाली आहे.

मी टायपिंगचा विद्यार्थी आहे,

तसेच अमरावतीला सलूनमध्ये हेअर कटिंग ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे शेवटच्या टायमिंगने अचलपूर येतो. ती बसफेरी अचलपुरात येणे गरजेचे आहे.

– प्रथमेश पुरबगोला.

एसटी महामंडळाने अमरावती- परतवाडा लास्ट टाइम अचलपुरात नेणे पुन्हा सुरू करावे, जेणेकरून येथील प्रवाशांना सुविधा होईल.

– बंटी ककरानिया.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!