शिक्षणाधिकारी कार्यालयात अडकली निलंबनाची परवानगी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शिंदी येथील खासगी संस्थेच्या शाळेतील एका सहायक शिक्षकाने विद्यार्थ्यांची छेड काढल्याच्या प्रकरणात संस्थेने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला निलंबनाची परवानगी मागितली. परंतु कार्यालयातर्फे ती अजूनही देण्यात आलेली नाही. यामागे दबावतंत्र की वेळकाढू धोरण, अशी तालुक्यात चर्चा रंगली आहे.

अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या शाळेतील सहायक शिक्षक संदीप भीमरावजी पाचपोर याने विद्यार्थिनीसोबत केलेल्या गैरकृत्यामुळे तिने पथ्रोट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारत न्याय संहितेचे कलम ७४ व ७५ व तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविला. शिक्षकावर कारवाई न झाल्यास शाळेचे कामकाज बंद पाडण्यात येईल व इतर शिक्षकांनाही त्याचा त्रास होईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला. अचलपूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. समाज माध्यमांनी हा प्रकार उचलून धरला. या संपूर्ण प्रकारची माहिती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी प्रशासनाला पाठवली. त्यासोबत संस्थेने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाला संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यासंदर्भात परवानगीसाठी पत्र पाठविले. परवानगी मिळाल्यानंतर संस्थेचे संचालक संबंधित सहायक शिक्षक संदीप पाचपोर याला निलंबित करतील. परंतु अजूनही संबंधित कार्यालयाकडून परवानगी न मिळाल्याने दबावतंत्र की वेळकाढू धोरण, यावर चर्चा रंगली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!