
अमरावती : राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका व ग्रामगीताचार्य डॉ. शोभा गायकवाड (Dr. Shobha Gaikwad) यांच्या दहा पुस्तकांचा प्रकाशन समारंभ रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.
प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सतीश तराळ डॉ. प्रतिमा इंगोले डॉ. अलका गायकवाड वैभव भिवरकर उपस्थित राहतील. याप्रसंगी आमदार रवी राणा व सौ नवनीत राणा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. जाधव पॅलेस बडनेरा रोड अमरावती येथे रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 ला हा समारंभ आयोजित केला आहे. प्रकाशन समारंभ नंतर प्राचार्य राजवलीकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विश्व साहित्य संस्था व आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






