बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य; तुम्ही नोंदणी केली का?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून संसारोपयोगी साहित्य दिले जाते. जिल्ह्यात ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १ लाख ९२ हजार ५३१ बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ७६ हजार ४७७ जणांची नोंदणी झालेली असून, यापैकी ५२ हजार ३४३ अर्ज प्रलंबित आहेत. सदर योजनेमधून आतापर्यंत १ लाख ८६ हजार ४६ कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात आले आहेत, तर ३४ हजार ३९४ बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या ७६ हजार ४७७ हजार बांधकाम कामगारांना शासनाकडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप झाले असले तरी उर्वरित लाभार्थी मात्र वेटिंगवर आहेत.

१ लाख ९२ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी जिल्ह्यात बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी आतापर्यंत ३ लाख २३ हजार ३४० बांधकाम कामगारांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,९२,५३१ अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ७६ हजार ४७७ नोंदणी केली.

संसारोपयोगी साहित्य कोणते? ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, पातेले, झाकणे, मोठा चमचा, भातवाढी, स्टीलचा ड्रम, मसाला डबा, प्रेशर कूकर, कढई, स्टीलची काटी झाकण्यासाठी, अशी ९ प्रकारची स्टीलची भांडी (३० नग) पुरविली जातात.

 

नवीन कामगारांची नोंदणी करता येईल का? कामगारांना आपल्या क्षेत्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जायचे आहे. कार्यालयाकडून बांधकाम कामगार नोंदणी अर्ज दिल्यानंतर आवश्यक माहिती भरून अर्ज आवश्यक कागदपत्रांसह नाममात्र शुल्क भरून जमा करावयाचा आहे.

 

३४ हजार ३९४ कामगारांना साहित्याचे वाटप जिल्ह्यात नोंदणी झालेल्या १ लाख ९२ हजार ५३१ बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ७६ हजार ४७७ जणांची नोंदणी झालेली असून, यापैकी ५२ हजार ३४३ अर्ज प्रलंबित आहेत. सदर योजनेमधून आतापर्यंत १ लाख ८६ हजार ४६ कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप कीले आहेत, तर ३४,३९४ कामगारांना गृहपयोगी संच वाटलेत.

 

१.८६ हजार कामगारांना सुरक्षा किटचे वाटप नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून सुरक्षा किटसह अत्यावश्यक किटही उपलब्ध करून दिल्या जातात. आतापर्यंत १ लाख ८६ हजार ४६ एवढ्या कामगारांना जिल्ह्यात बांधकाम सुरक्षा किट वितरित करण्यात आल्या आहेत.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013560
error: Content is protected !!