शिवशाही बसचा ब्रेकडाऊन; बसेसची झाडाझडती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागांतून धावणाऱ्या शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने अपघात, ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाहीची विशेष तपासणी विशेष अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील ३९ शिवशाही बसेसची शुक्रवारपासून तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीसाठी यवतमाळ विभागातील एसटी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले आहेत. या तपासणीचा अहवाल ४ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अमरावती विभागातील ८ पैकी ५ आगारांमध्ये शिवशाही धावतात. दि. २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शिवशाही तपासणी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाचे यांत्रिक विभागांना दिले आहेत.

बसची अवस्था दयनीय महामंडळाने आठ वर्षांपूर्वी शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतल्या. मात्र, आता सर्वच बसची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवशाहीचे अपघात वाढले आहेत. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणदेखील वाढले आहे. बसमधील एसी बंद, सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वातानुकूलित बसच्या नावाखाली जास्त पैसे घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढते अपघात आणि तक्रारींच्या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील शिवशाहीची विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी जिल्ह्यात यवतमाळ येथील अधिकाऱ्यांचा चमू दाखल झाला आहे. यांच्याकडून शिवशाही बसची तपासणी केली जात आहे.

 

उणिवा व उपाययोजनांबाबत होणार मंथन तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी, उणिवा, त्याकरिता कशाप्रकारे उपाययोजना करता येतील आदींबाबतची तपासणी करावी. त्याचा तपासणी अहवाल संबंधित विभागास व मुख्य कार्यालयास चार जानेवारीपूर्वी ई- मेलद्वारे सादर करण्याचे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

जिल्ह्यात ३९ शिवशाही अमरावती विभागातील अमरावती आगारात १३, बडनेरा ११, परतवाडा ५, वरुड १, दर्यापूर ५ अशा एकूण ३९ शिवशाही बसेस उपलब्ध आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013560
error: Content is protected !!