कुरूंदा/ हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकास सव्वा लाख रुपयाचे खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,हे प्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारखान्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तो मागे घेण्याच्या मागणीसाठी माजी खासदार शिवाजी माने यांनी ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले .जवळपास अर्धातास त्यांनी आंदोलन केले पोलिसांनी योग्य प्रकारे तपास करण्याचा आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना आता सहयोगी तत्वावर तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव जिल्हा परभणी हा कारखाना चालवित आहे.या कारखान्याचे कार्यकारी संचालक फिर्यादी प्रल्हाद गायकवाड हे कार्यालयात २१ फेब्रुवारी रोजी कामकाज करीत बसले असताना त्यांच्याकडे आरोपींनी मागील अध्यक्ष हप्ता देत होते, तुला कारखाना नीट चालवायचा असेल तर आम्हाला सव्वा लाख रुपये हप्ता खंडणी द्यावी लागेल,अन्यथा जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.
त्यानंतर तिघांनी कक्षात गोंधळ घालून खुर्च्या फेकून दिल्या व फिर्यादी गायकवाड यांना यांची कॉलर धरून खाली पाडले ,तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली, या प्रकरणी फिर्यादी प्रल्हाद गायकवाड यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी कोंडबा कदम राहणार वरताळा, गंगाधर लोकेवार राहणार कुरुंदा ,अरविंद जाधव राहणार सोमठाणा, या तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
कुरुंदा पोलीस ठाण्यासमोर या प्रकरणी माजी खासदार शिवाजी माने यांनी जवळपास आर्धा तास ठिय्या मांडला, चुकीच्या पद्धतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कर्मचारी आणि शेतकर्यांचा आवाज दाबण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे दाखल झालेला गुन्हा मागे घ्या अशी मागणी करण्यात आली, हा प्रकरणी योग्य चौकशी करून कारखान्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची मागणी करण्यात आली, योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर माजी खा. शिवाजी माने यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com