अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारंभरविवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता विद्यापीठ परिसर येथे संपन्न होत आहे. या समारंभाचे
अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भूषवतील. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते स्वागतपर भाषण व प्रास्तविक करतील. दीक्षांत समारंभाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव अविनाश असनारे, परीक्षा मूल्यांकन विभागाचे नियंत्रक डॉ. नितीन कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सभासद तसेच विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित राहतील. या दीक्षांत समारंभात ३८ हजार ३०५ पदवीकांक्षींना व २३८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखाधिकारी सीए पुष्कर देशपांडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.
११२ सुवर्ण, २२ रौप्य व २४ रोख पारितोषिकांची लयलूट
• दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना १२२ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके व २४ रोख पारितोषिके असे एकूण १६८ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
• दीक्षांत समारंभात पदक, बक्षिसांत मुले व मुलींमध्ये सर्वाधिक जी.एस. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील हर्षाली हटवार या विद्यार्थिनीला सुवर्ण ६ व रोख पारितोषिक १ मिळणार आहे.
प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्डन्ड रिसर्च, बडनेरा येथील निकीता देवचे या विद्यार्थिनीला सुवर्ण ६, तर लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथील उत्कर्षा वानरे या विद्यार्थिनीला सुवर्ण ४, रौप्य १ व रोख पारितोषिक

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com