जिवंत काडतूस जप्त दुचाकी सोडून पळणाऱ्या युवकाला अटक
अचलपूर : जिवंत काडतूस व देशी कट्टा विक्री होत असल्याच्या माहितीवरून अचलपूर पोलिसांनी कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला आणि एका युवकाला सोमवारी दुपारी अटक केली.
अचलपूर पोलिसांनी जुना एसटी स्टैंड येथे सापळा रचला. अक्षय ऊर्फ हिमांशू ब्रिजमोहन बरदेला (२७, रा. सुदर्शननगर, फर्मानपुरा) हा दुचाकीने तेथे आला होता. तथापि, पोलिसांना पाहून दुचाकी सोडून तेथून पळत सुटला. मागावर असलेल्या अचलपूर पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. दुचाकीसह पोलिसांनी एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला. त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनात अचलपूरचे ठाणेदार गजानन मेहत्रे, पुरुषोत्तम बावणेर, श्रीकांत वाघ, नितीन कळमटे, मंगेश पाटील, प्यारेलाल जामूनकर यांनी पार पाडली.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com