टायर तपासा; उष्णता वाढली, दुर्लक्ष नको

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

धामणगाव रेल्वे : वाढत्या उन्हाळ्यात वाहनांच्या टायरची स्थिती, टायरमधील हवेचा दाब समतोल ठेवण्याकडे कानाडोळा करणे महाग पडू शकते. उन्हाळ्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग गरम होतो. त्यामुळे टायर निकामी होण्याची अधिक शक्यता असते. टायर फुटून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका वाढू शकतो.

शहरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके आहे. यामध्ये काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टायरची निगा राखणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढलेली असते. त्यात टायर रस्त्यावरून जाताना त्यातील हवा तापते. त्यामुळे टायर फुटण्याची, अपघाताची दाट शक्यता असते. याव्यतिरिक्त टायर चार वर्षे जुने असणे, टायरला कडेला तडे जाणे हीसुद्धा टायर फुटण्याची कारणे आहेत.

सध्या जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यामधील उष्णता अतिशय असह्य होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनाने मोठ्या लांबच्या प्रवासाला जात असताल तर आपले वाहन एकदा सुरळती आहे की नाही याची खात्री करावी. टायरमधील हवा देखील चेक करावी.

 

 

नायट्रोजन अधिक सुरक्षित बरेच लोक त्यांच्या कारच्या टायरमध्ये नॉर्मल हवा भरतात, जी कारच्या टायरसाठी चांगली नसते. कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरणे योग्य मानले जाते. असे मानले जाते की, गाड्यांचे टायर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात नायट्रोजन गॅस भरणे उत्तम आहे. नायट्रोजन भरल्यास तुलनेने अपघाताचा धोका कमी होतो.

उन्हाळ्यात वाढतात टायर फुटण्याच्या घटना उन्हाळ्यात रस्ते गरम झालेले असतात. आता सर्वत्र सिमेंटचे रस्ते आहेत. सिमेंट जास्त तापतात. अशा वेळी जर टायरमधील हवा जास्त किंवा कमी असेल तर टायर फुटतात.

नेमक्या किती किलोमीटरला वाहनांचे टायर बदलावेत?टायर निर्मिती करणाऱ्या कंपन्या तीन वर्षांनी टायर बदलावे, असे सांगतात. परिसरातील हवामानानुसार व्यावसायिक चार वर्षांनी टायर बदला, असे सांगतात. तसेच टायर कट झाले असल्यास अथवा फुगवटा आलेला असेल, तर टायर तत्काळ बदलावेत. वाहनाचे टायर ३० ते ५० हजार किमी चालल्यानंतर बदलले पाहिजेत. मात्र, हे टायरच्या क्वालिटी, ड्रायव्हिंग शैली आणि परिस्थिती यावर अवलंबून असते.

वाहनाचे जुने, चिरलेले टायर प्रवासात धोकादायक कोणत्याही गाडीची सुरक्षितता त्याच्या टायरच्या सुस्थितीवर अवलंबून असते. प्रवासाला निघताना अथवा बाहेर जाताना टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे की नाही, याची खात्री करा. वाहनांची वेळोवेळी सव्र्व्हिसिंग महत्त्वाची आहे. काहीही शक्यता वाटली, तर लगेच वाहनाची तपासणी करून घ्यावी.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Our Visitor

0 5 0 3 1 2
Users Today : 14
Users This Month : 324
Total Users : 50312
error: Content is protected !!