वनोजा बाग : तालुक्यातील येवदा-वनोजा बाग-सातेगाव फाटा या रस्त्याची खड्यामुळे दयनीय अवस्था झाल्यामुळे रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीकरिता २५ फेब्रुवारीपासून वनोजा बाग येथे श्रीक्षेत्र लखमाजी महाराज संस्थानात रवींद्र वानखडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खारोडे, वनोजाच्या सरपंच शालिनी गायगोले, ग्रामपंचायत सदस्य महादेव पातोंड, हिंगणी येथील उपसरपंच दिनेश अगडते, सामाजिक कार्यकर्ते देवानंद थोरात यांनी बेमुदत उपोषणाला छेडले आहे. हा रस्ता दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व आकोट हे तीन तालुके व जवळपास आठ ते दहा गावे जोडतो. लखमाजी महाराज देवस्थानाला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाकरिता येत असतात. वारंवार प्रशासनाकडे रस्ता दुरुस्ती करण्याकरिता मागणी केली तरी कार्यवाही झाली नाही. बाळासाहेब काळमेघ, राजेंद्र गायगोले, सातेगावच्या माजी सरपंच सीमा हाडोळे, दादाभाऊ राऊत, डॉ. गाडगे, विशाल वाढोकर, मोहन ठाकरे, पोलीस पाटील रवींद्र राजगुरू, सुरेश काकड, प्रशांत गायगोले, चंदन गायगोले, उमेश काकड, सागर साबळे, छोटू मानकर आदींनी उपोषणाला पाठिंबा दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय गोहाड, श्रीकांत ठाकरे व आदिनाथ सानप यांची उपोषणकर्त्यासोबत चर्चा निष्कळ ठरली.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com