चांदूर रेल्वे : तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान ऊर्फ श्रीकृष्ण अवधूतबुवा संस्थान येथे २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता संस्थानच्या लहान मंदिरात विधिवत ढाल बसवून मुख्य मंदिरात चैत्र मांडीचा शुभारंभमहाराजांच्या गणाने विश्वस्त मंडळ आणि भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. दुपारी ४ वाजता अमावास्यानिमित्त चंदन उटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानंतर भाविकांकरिता महाप्रसाद रुख्मिणी चांगोले यांच्याकडून अन्नदान समितीच्या नियोजनात होईल. २७ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान संस्थानतर्फे अखंड जागृती भजन मांडीचे आयोजन केले आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत यांनी केले आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 31