२८ फेब्रुवारीला साजरा होतो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’; सन १९३० मध्ये मिळाले नोबेल
अमरावती : विज्ञानात भौतिकशास्त्राचे नोबेल मिळविणारे भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमण परिणामांचा शोध लावला. त्यांनी केलेल्या या शोधाची आठवण म्हणून भारतात हा दिवस १९८७पासून ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
भारताचे थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. त्यांचा जन्म सन १८८८ मध्ये तिरुचिलापल्ली येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात मद्रास येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. कलकत्ता विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात ते १६ वर्षे प्राध्यापक होते.
निसर्गातील विविध रंगाची सूष्टी फुले, फुलपाखरे, रंगीबेरंगी पक्षी रत्ने यांचे चित्ताकर्षक रंग या साऱ्याविषयी त्यांना अपार आकर्षण होते.
विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सन १९२१ मध्ये त्यांना इंग्लंड व युरोपला जाण्याची संधी मिळाली. बोटीतून युरोपच्या वाटेवर असताना त्यांनी भूमध्य समुद्राचे स्वच्छ निळेशार पाणी पाहिले आणि सागरजलाच्या निळाईवर त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातूनच पुढे त्यांनी रमण परिणामाचा शोध लावला. या शोधाबद्दल त्यांना सन १९३० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिलाते तर भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ ही देशातील सर्वोच्च पदवी देऊन सन्मान केल्याचे. मराठी विज्ञान परिषदेचे अमरावतीविभाग अध्यक्ष प्रवीण गुल्हाणे व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी ‘z24news.inला’ सांगितले.
ब्रिटिश सरकारने दिली ‘सर’ ही पदवी पारदर्शक माध्यमातून प्रकाशकिरणे जात असताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला ‘रमण स्प्रेटम’ हे नाव देण्यात आले. या नव्या वर्षरेषांना रमण लाइन्स अशी नावे देण्यात आली. तसेच या घटनेला ‘रमण इफेक्ट’ असे नाव देण्यात आले.
आज जगभर ही नावे रूढ झाली आहेत. रमण यांना ब्रिटिश सरकारने ‘सर’ या पदवीने सन्मानित केले.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com