सीईओ संजीता महापात्र : थेट बीडीओ किंवा सीईओंकडे करा तक्रार
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेतील घरकुले मंजूर झाली आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. ही कामे करताना घरकुल लाभार्थी व मनरेगाची किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थ्यांची अडवणूक केल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास लाभार्थ्यांनी याबाबत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे थेट मोबाईलवर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी केले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेतील घरकुले मंजूर झालेली आहेत. सर्व मंजूर लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप केले असून, घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कमही बँक खात्यावर जमा झालेली आहे. लाभार्थीकडून विहीर कालावधीत घरकुल बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी ही तालुकास्तरीय यंत्रणेवर आहे. अशातच ग्रामविकास मंत्र्यांनी ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या विभागीय बैठकीत आवास योजना, मनरेगा आदी कामांची गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकारी यांच्यावर राहील, असे निर्देशित केले आहे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी ८ फेब्रुवारी रोजी सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संजीता महापात्र यांनी ग्रामीण भागातील घरकुलाचे लाभार्थी व मनरेगाची किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थ्यांची अडवणूक झाल्यास किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधित बीडीओ किंवा सीईओंकडे मोबाईलवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com