बलात्काराचा गुन्हा दाखल :
पीडिता गर्भवती
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला गर्भवती करण्यात आले. आता मात्र आरोपीने लग्नास व होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत बुधवारी उघड झाली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी नीलेश खोब्रागडे (२४, रा. सावर्डी, नांदगाव पेठ) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, फिर्यादी तरुणी ही तिच्या आईसोबत एका गावात राहात होती. तेथे तिची आरोपी नीलेशशी ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही
लग्नाच्या आणाभाका घेतल्या. टेलिफोन व सोशल मीडियावर दोघेही व्यक्त होऊ लागले. दरम्यान, १२ जानेवारी २०२५ रोजी आरोपीने फिर्यादीस गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलनीत भाड्याची रूम करून दिली. तोही तेथे राहू लागला. त्याने तरुणीच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घातले तथा तिला लग्नाचे आमिष दिले. तेथे शारीरिक संबंधदेखील ठेवले.
आता म्हणतो, तो मी नव्हेच !
त्या शरीरसंबंधांमुळे तरुणीला गर्भधारणा झाली. तिने ती बाब नीलेशला सांगितली. त्यावेळी मला हे बाळ पाहिजे, अशी बतावणी त्याने केली. मात्र, आता तो आपल्यासह होणाऱ्या बाळाला मान्य करीत नसून लग्न करण्यास नकार देत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. फसवणूक केल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाणे गाठले.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com