अचलपूर : अल्पवयीन व काही तरुणांचा समावेश असलेल्या टोळक्यांच्या आपसी वादात चाकूने प्राणघातक हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी मागील १८ फेब्रुवारीपासून पसार होता. तरूड येथे लपून बसलेल्या या आरोपीला अचलपूर पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले.
पोलिस सूत्रांनुसार, जितू मुकेश हाटे (२३, रा. सुदर्शननगर, फर्मानपुरा, अचलपूर), असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १८ फेब्रुवारी रोजी रोशन कैलास चरपटे (१९, रा. माळवेशपुरा) याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते. एकूण दहा आरोपींपैकी जितू हाटे हा प्रमुख आरोपी होता. त्याच्याविरुद्ध हाफ मर्डरची केस लावण्यात आली होती. तेव्हापासूनच तो फरार होता. तो वरूड येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळताच ठाणेदार गजानन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात अमलदार प्यारेलाल जामूनकर, अंमलदार अनिल झरेकर यांनी वरूड येथे पोहोचून त्याला बुधवारी रात्री अटक केली व अचलपूर पोलिस ठाण्यात आणले. त्याच्यापासून प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अचलपूर शहराची संवेदनशिलता पाहून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणाचा आरोपी तातडीने अटक करण्याचे निर्देश अचलपूर पोलिसांना दिले होते.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com